top of page
Search

अनुत्तरित प्रश्न…

दुपारची वेळहोती, माधुरीचीगाडीसुसाटधावतहोती. उन्हाच्याझळालागतहोत्यापणतिलात्याचीपर्वानव्हती. सासूबाईंचाऑफिसमध्येफोनआलाकिलहानग्याबाळालाउलट्याहोतआहेत, सुदैवानेऑफिसमध्येकोणतीहीमीटिंगनव्हती, मॅनेजरसरांनासांगूनतीतडकनिघाली, गाडीच्यास्पीडबरोबरतिच्याविचारांनीहीस्पीडघेतलाहोता , ‘कायझालेअसेलमाझ्याबाळाला, मागच्याआठवड्याततरसर्दीपडसेकमीझालेतोपर्यंतहेनवीनकायसुरुझाले? आतात्याचीपरतकिरकिरवाढणारआणिपरतआजरात्रीझोपनाहीमिळणारमलाआणित्यातआजारपणामुळेवाढलेलीकामेआहेतचसाथीला. सासूबाईआहेतपणत्याहीथकूनजातातदिवसभर, त्याबाळालासांभाळतातहीचखूपमोठीगोष्टआहेकारणपाळणाघराचाअनुभवफारकाहीबरानाहीय.’ सगळ्याविचारांनीतिचेडोकेभणभणायलालागले. तीघरीपोहचली, सासूबाईआणिबाळालाघेऊनडॉक्टरांकडेपोहचलीखरी, पणतिच्यातील ‘आई’ लामात्रचैननव्हती.



घरी येऊन उलटीचे औषध पाजून तिने बाळाला दूध पाजण्यासाठी कुशीत घेतले आणि बाळ झोपतोय हे पाहून स्वतः हि डोळे मिटले. तिने डोळे मिटले खरे पण मागच्या दोन वर्षातला तिचा प्रवास तिच्या डोळ्यासमोर तरळू लागला.सुधीरला अमेरिकेचा व्हिसा मिळाला तेंव्हा ती फक्त ३ महिन्याची प्रेग्नन्ट होती. अमेरिकेला जाणे सुधीरचे स्वप्न होते तो खूप खुश होता .तिचा जॉब, तिचे करिअर तिला सोडायचे नव्हते त्यामुळे ती सुधीर सोबत जाण्याचा प्रश्नच नव्हता. आणि शिवाय अनोळखी देशात तिच्या पिलाला जन्म देण्यास तिचे मन धजावत हि नव्हते. त्यामुळे ती इथे भारतात राहून तिचा जॉब, तिचे करिअर, आणि पर्यायानें तिचा संसारहि एकटी सांभाळणार होती.हे तिच्या तिने ठरवले, अगदी स्वखुशीने.

पण जसजशे प्रेगनंसि चे दिवस पुढे सरकू लागले तेंव्हा एकटी च्या प्रवासातल्या सुधीर च्या पोकळ जागा तिला जाणवू लागल्या. सहाव्या महिन्यात ज्या क्षणी बाळाची पहिली हालचाल तिला जाणवली तो क्षण तिच्या हृदयाची धडधड वाढवणारा होता, तो क्षण खूप नवा होता पण खूप आनंद देणारा होता, तो क्षण पोटात तयार होणाऱ्या तिच्या आणि सुधीरच्या बाळाची खरी जाणीव करून देणारा होता. पण त्या क्षणाचा एकत्र आनंद उपभोगायला सुधीर होता कुठे? तिथून तर खरी सुरवात झाली, प्रेगनंसी मध्ये होणाऱ्या उलट्या, मूड स्विंग ,सासूबाईंच्या छोट्या छोट्या शब्दावर होणारी चिडचिड सहन करून तिला कुशीत घेणारा सुधीर होता कुठे? लेबर पेन चालू झाले तेंव्हा आपल्याला किती भीती वाटत होती त्यावेळी हात हातात घेऊन धीर देणारा सुधीर होता कोठे? डिलिव्हरी नंतर बाळाला कौतुकाने कुशीत घेणारा त्याचा बाबा होता कुठे? बाळाचे पालथे पडणे, रांगणे, पहिले चालणे, पहिले बोलणे हे सगळे पाहण्यासाठी त्याचा बाबा होता कोठे? स्वप्ननांच्या मागे धावता धावता आयुष्यातील अनमोल आनंद हरवत होता त्याचा बाबा.

बंद डोळ्यांआड अश्रूना थांबवायचा प्रयत्न करत माधुरी विचार करत होती. बाळा मुले होणारी रात्र रात्र जागरणे, त्याचे आजारपण, त्यातून होणारी दगदग मी एकटीने सहन केली. माझ्या आजूबाजूला आई, बाबा, सासू सासरे, भाऊ, दीर सगळे होते पण यातल्या कोणाच्याच कुशीत शिरून मी निवांत दोन क्षण नव्हते घालवू शकत, कदाचित हे निवांत दोन क्षण घालवण्याचा मला अधिकार नाही कारण मी हट्टानं माझ्या करियर साठी मायदेशी राहायचा निर्णय घेतलाय. पण खार सांगू सुधीर तू निघून गेलास आणि गोष्टी माझ्यासाठी अवघड होते गेल्या , तुझ्या सोबत राहावे वाटते पण आता परिस्थिती अशी आहे कि तू तुझा प्रोजेक्ट अर्धा सोडून तू येऊ शकत नाहीस आणि मला खूप कष्टाने बनवलेले करिअर सोडवतहि नाही.

म्हणून केवळ हे सगळे सोसणे मला भाग आहे कारण मी एक आधुनिक स्त्री आहे जिला तिचे पाडस हि महत्वाचे आहे आणि तिचे करिअर हि. वाढणाऱ्या कुटुंबा बरोबर वाढणाऱ्या गरजा पाहून स्त्री ला नोकरी कारण भाग झालं आणि नोकरीला जाताना बाळाची मिठी सोडवणे मात्र जीवावर आले. ट्राफिक आणि गर्दीतुन वाट काढता काढता दमछाक व्हायला झाले तर कंपनीचे टार्गेट पूर्ण करता करता आवडत्या छंदाला दूर साराव लागल.स्पर्धेच्या युगात निदान काही वर्ष तरी एकटी ने संसाराचा गाडा ओढणे भाग झाले तर सुधीर सारख्या युवकांना कुटुंबा पासून दूर राहत सिलिकॉन व्हॉली ला जाणे क्रमप्राप्त झाले. शेवटी याला उपाय काय? स्त्री ने तिचे करिअर सोडावे कि पुरुषाने त्याच्या स्वप्नांना मुरड घालावी? दोन्ही प्रश्नांची उत्तरे सापडतील का? कारण काही प्रश्न अनुत्तरित असतात हेच खरे!

या प्रश्नां चा विचार करता करता माधुरी ला झोप लागली आणि निदान काही काळ तरी ती या अनुत्तरित प्रश्नाच्या दुनियेपासून दूर गेली


6 views0 comments
bottom of page